Sunday 3 April 2016

छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या कष्टाची जाणीव बाळगणारे, त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ न देणारे असे महाराज न्यायाची शिकवण देतात. त्यांच्या प्रेरणादायक शौर्याची आठवण काढतानाच त्यांच्या न्यायप्रियतेची आठवणही जागवली पाहिजे. आज महाराजांचे पुण्यस्मरण करताना जनतेने एकात्म भावनाही जागवावी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!


दरिया हटला मागे 


सह्यकडा आसवांनी भिजला


रायगडाच्या कुशीत


माझा राजा निजला


नका देऊ रे भालदारांनो


कुणाच्या भेटीचा निरोप आता


येऊदे माझ्या राजाला 


सुखाची झोप आता


जगदीश्वरा तुझ्या पायरीला आता 


शिवगंधाचे भाळ टेकणार नाही


नगारखान्या तु पुन्हा


"जगदंब जगदंब" चे बोल ऐकणार नाही


मावळ्यांनो आता सोन्याच्या कड्याला


तुमची चढाओढ लागणार नाही


राजांनी कौतुक करावं म्हणुन


आता कोणी नारळ काढणार नाही


शंभुराजे आता कोण तुम्हाला


"शंभूबाळ" अशी हाक मारणार ???


पोरक्या कवड्याच्या माळे


तुझ्यावर कोणाचा हात फिरणार ???


राजसदर कोमेजलिए राजे


सिंहासनाने मान टाकली आहे


तुमचे पाय शिवायला बघा


नगारखान्याची कमानही झुकली आहे


तानाजी बाजी असतील सेवेला


राजे म्हणुन काळजी वाटत नाही


पण राजे बुरुजावरचा जरीपटका


आता वार्यावर फडफडत नाही


आकाश काळवंडून गेलय


आता तो सुर्यही विझला


रायगडाच्या कुशीत


माझा राजा निजला🙏


३ ऐप्रिल राजे शिवराय


#स्मृतिदिन 



🙏
🏻
💐🙏
🏻
स्वराज्य निर्मितीकरिता तळपणाऱ्या शिवसुर्यास भिजलेल्या आसवांनी नतमस्तक होऊन ञिवार अभिवादन..!🚩😢
#स्मृती_दिन
#मानाचा_मुजरा

पोरके झालो आम्ही... पोरकी झाली स्वराज्यातील रयत...कीती रडली असेल ती रयत, कीती रडला असेल तो रायगड, अरे आभाळाची ही छाती फाटली असेल.विचारल असेल त्यांनी एकमेकांना आता छत्रपती शिवबा कधी दिसेल !!जगाच्या इतिहासातील काळा दिवस. दि- ३ एप्रिल इ.स १६८०.स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले रायगडावर निधन...🙏🙏
💐त्रिवार अभिवादन💐
🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय

Sunday 10 January 2016

राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या जन्मोत्सवा निमित्त


 शालेय शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम...